January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 401 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 218 पॉझिटिव्ह

273 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 619 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 401 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 218 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 185 व रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 212 तर रॅपिड टेस्टमधील 189 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 401 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : तरवाडी 1, वडनेर 1, खामगांव तालुका : जळका भडंग 1, बोरजवळा 1, वर्णा 3, घाटपुरी 1, खामगांव शहर : 23, जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, बुलडाणा शहर : 23, बुलडाणा तालुका : वरवंड 1, साखळी 1, अजीसपूर 2, केसापूर 1, भादोला 1, पळसखेड 1, दाभा 1, शेगांव शहर : 6, दे. राजा शहर : 13, दे. राजा तालुका : चिंचखेड 1, धोत्रा 4, दे. मही 1, रोहीखेड 1, किन्ही पवार 1, गोंधनखेड 1, गारगुंडी 2, चिखली तालुका : सातगांव भुसारी 2, भानखेड 3, वळती 2, सावरगांव डुकरे 1, दे. घुबे 2, एकलारा 1, जळी 1, हेलगा 1, चिखली शहर : 13, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 4, मादनी 1, उकळी 1, डोणगांव 1, जानेफळ 1, मलकापूर तालुका : वाघोळा 1, झोडगा 2,हिंगणा काझी 1, कुंड 2, धरणगांव 3, मलकापूर शहर : 13, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका :सिं. लपाली 2, बोराखेडी 1, आव्हा 1, धा. बढे 2, लोणार शहर : 4, लोणार तालुका : जांभुळ 2, पिंप्री खंडारे 1, चिखला 1, सुलतानूपर 1,बिबी 1, सि.राजा तालुका : राहेरी 14, वारोडी 4, बारलींगा 1, तांबेवाडी 1, आंबेवाडी 1, साखरखेर्डा 2, जांभोरा 6, सिं.राजा शहर : 2, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, बोडखा 1, मूळ पत्ता रिसोड जि. वाशिम 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 218 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पोलीस लाईन, बुलडाणा येथील 55 वर्षीय पुरूष व दे. माळी ता. मेहकर येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 273 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार बरे होवून सोडलेले रूग्ण खामगांव : 28, जळगांव जामोद : 30, सिं. राजा : 25, मेहकर : 13, शेगांव : 18, मलकापूर : 26, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 56, चिखली : 12, नांदुरा : 16, दे. राजा : 22, लोणार : 19, मोताळा : 4.
तसेच आजपर्यंत 24097 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4033 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4033 आहे.
आज रोजी 1474 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 24097 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5254 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4033 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1155 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 66 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

२५ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यु

nirbhid swarajya

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी २० वर्हाडी समोर लावले लग्न

nirbhid swarajya

अंधश्रद्धेला फाटा देत पार पडला आगळा वेगळा शिव विवाह

nirbhid swarajya
error: Content is protected !!