52 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 441 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 399 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 160 तर रॅपिड टेस्टमधील 239 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 399 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :चिखली शहर : 5, चिखली तालुका : इसरुळ 1, दिवठाना 1, माळशेंबा 1, टाकरखेड हेलगा 2, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1,शेलगांव राऊत 1, साखरखेर्डा 2, बुलडाणा शहर : 3, लोणार शहर : 4, लोणार तालुका : किन्ही 1, खामगाव शहर :1, खामगाव तालुका : गवंढळा 1, हिवरखेड 2, शिरसगाव देशमुख 1, नांदुरा तालुका: खैरा 1, नारखेड 2, नांदुरा शहर : 6, मलकापूर तालुका: दाताळा 1, मलकापूर शहर : 1, मोताळा तालुका : सावरगाव 2, जळगाव जामोद शहर : 1 व मूळ पत्ता नाशिक येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 52 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 8, दे. राजा : 4, बुलडाणा : अपंग विद्यालय 4, मोताळा : 7, चिखली : 2, जळगाव जामोद: 8, खामगाव : 7, मेहकर : 10, सिंदखेड राजा : 2.
तसेच आजपर्यंत 36406 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7917 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7917 आहे.
आज रोजी 554 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36406 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8466 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7917 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 436 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.