46 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 440 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 385 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 52 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 296 तर रॅपिड टेस्टमधील 89 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 385 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : सागवन ता. बुलडाणा: 1, नांदुरा : दुर्गा नगर 1, पी एच सी वसाहत 2, खामगाव:2, वाडी 3, अमृतनगर 1, सामान्य रुग्णालय 1, गोपाल नगर 2, घाटपुरी नाका 3, दे. राजा: भगवान बाबा नगर 1, धोत्रा नंदाई ता. दे राजा: 1, बीबी ता. लोणार:9, चिखली: 3, किनी सवडत ता. चिखली: 1, बुलडाणा: 1, मसरुळ ता. बुलडाणा: 1, मेहकर: 15, शेगाव: मोदीनगर 1, भूत बंगला जवळ 2, गोमाजी नगर 2, गौलखेड 1, जलंब ता. शेगाव: 1 व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 46 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा: सिविल कॉलेनी 1, दे. मही ता. दे.राजा: 1, बावनबीर ता. संग्रामपूर : 1, बुलडाणा: जोहर नगर 1, विष्णूवाडी 2, बाजार समिती परिसर 2, सुवर्ण नगर 1, जिजामाता नगर 1, चांडोळ ता. बुलडाणा: 1, लोणार: 1, वरवट बकाल ता. संग्रामपुर : 1, वडनेर भोलजी ता. नांदुरा :1, दीवठाणा तालुका चिखली: 1, मोताळा: 1, धा. बढे ता. मोताळा: 1, दाताळा ता. मलकापुर:1, नांदुरा: जामा मस्जिद जवळ 1, विठ्ठल मंदिराजवळ 3, खामगाव: डीपी रोड 3, सती फैल 2, आठवडी बाजार 1, शेगाव: पोलीस स्टेशन 1, देशमुख पुरा 1, दे. राजा: 2, अहिंसा नगर 1, चिखली: 1, अमरापुर ता. चिखली:1, शेलगाव आटोळ ता. चिखली: 1, सोनेवाडी ता. चिखली :1, साखळी बू. ता. बुलडाणा: 1, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा: 1, सुलतानपूर ता. लोणार :6, अंजनी खुर्द ता. मेहकर: 1
तसेच आजपर्यंत 16018 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1941 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1941 आहे.
आज रोजी 1027 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 16018 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2744 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1941 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 761 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.