102 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 476 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 338 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 138 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 129 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 277 तर रॅपिड टेस्टमधील 61 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 338 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : सिंदखेड राजा तालुका : वाघजाई 11, पिंपळगाव सोनारा 5, आडगाव राजा 1, मलकापूर पांग्रा 1, दे. राजा शहर : 12, दे. राजा तालुका : गोंधन खेडा 1, सिंदखेड राजा शहर :1, लोणार तालुका : पंगरा डोळे 1, वडगाव तेजन 2, रायगाव 4, वझर आघाव 6, हिरडव 1, सुलतानपूर 1, मांडवा 1, जांभूळ 1, लोणार शहर :2, मेहकर तालका : नायगाव 1, नागझरी 1, ब्रह्मपुरी 1, डोणगाव 2, जानेफळ 1, बरटाळा 1, सोनाटी 2, दे माळी 1, विश्वी 1, दुधा 1, पिंपळगाव माळी 1, मेहकर शहर :9, मलकापूर शहर : 7, मलकापूर तालुका : धरणगाव 1, चिखली शहर :18, चिखली तालुका : करतवाडी 1, हिवरा गडलींग 1, दिवठाणा 1, उंद्री 1, कोलारा 2, पिंपरी माळी 1, बुलडाणा शहर : 8, मोताळा तालुका : बोराखेडी 2, जळगाव जामोद तालुका : धानोरा 1, जळगाव जामोद शहर :3, शेगाव शहर :1, खामगाव तालुका : शिरला नेमाने 3, घारोड 1, घाटपुरी 1, खामगाव शहर :6, नांदुरा शहर :5, मूळ पत्ता वाकद जि वाशिम येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 138 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत.
तसेच आज 102 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 33, खामगाव : 37, दे. राजा : 14, चिखली :1, मेहकर :1, मलकापूर :2, नांदुरा : 2, लोणार :, शेगाव :1, जळगाव जामोद : 7, संग्रामपूर 4,
तसेच आजपर्यंत 31888 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6514 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6514 आहे.
आज रोजी 669 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 31888 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7648 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6514 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1035 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 99 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post