55 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 407 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 335 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 72 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 व रॅपिड टेस्टमधील 34 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 233 तर रॅपिड टेस्टमधील 102 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 335 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा: 2, धोत्रा नंदाई ता. दे. राजा: 3, मेंडगाव ता. दे. राजा: 6, दे. मही ता. दे. राजा: 1, बुलडाणा शहर: रामनगर 2, शिक्षक कॉलनी 1, केशव नगर 3, चांडक ले आऊट 1, चिखली शहर : 3, वाल्मीक नगर 1, चिखली तालुका : कारखेड 1, पांढर देव 1, शे. आटोल 1, पेठ 1, आंधाई चांधाई 1, मलकापूर शहर : बरादरी 1, लोणार: 1, नांदुरा शहर : 1, गावंडेपुरा 2, हेलगे नगर 2, नांदुरा तालुका: निमगाव 1, मळेगाव गोंड 1, रसुलपुर 1, शेगाव शहर : आरोग्य कॉलेनी 1, मोदी नगर 1, राधाकृष्ण मॉल जवळ 3, शेगाव तालुका : माटरगाव 1, एकलारा ता. संग्रामपूर :1, खामगाव शहर: 2, व्यंकटेश नगर 1, वाडी 3, कदमापुर ता. खामगाव: 5, जळगाव जामोद शहर: 4, माळी फैल 2, उमरद ता. सिंदखेड राजा : 6, मेहकर शहर: 3, मेहकर तालुका : हिवरा खुर्द 1
संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 72 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान बुलडाणा येथील 25 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 55 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्ण पुढील प्रमाणे: मेहकर शहर: 6, मेहकर तालुका : चायगाव 3, नागापूर 1, बुलडाणा शहर: 5, विष्णु वाडी 1, मिलींद नगर 1, मासरुल ता. बुलडाणा: 1, कुंड खुर्द ता. मलकापूर: 1, शेगाव शहर : सिध्दी विनायक नगर 2, मिलींद नगर 1, धनोकर नगर 3, गौरक्षण रोड 1, जलंब ता. शेगाव 1, सुलतानपूर ता. लोणार : 10, दे. मही ता. दे. राजा: 1, जळगाव जामोद: 1, खामगाव : टापरे नगर 1, वाडी 1, नीळकंठ नगर 3, लोणार: 1, धा. बढे ता. मोताळा : 1, नांदुरा शहर: शिवाजी नगर 3, नवाब पुरा 4, पी. एच सी जवळ 1,पोलीस स्टेशन रोड 1.
तसेच आजपर्यंत 17290 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2106 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2106 आहे.
आज रोजी 777 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17290 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2983 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2106 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 831 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 46 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post