January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 330 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 67 पॉझिटिव्ह

35 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 397 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 330 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 67 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 41 व रॅपिड टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 144 तर रॅपिड टेस्टमधील 186 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 330 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली : 2, संभाजी नगर 1, सातगांव म्हसला ता. बुलडाणा : 2, मलकापूर : 1, आनंद सोसायटी 2, मोताळा : 1, गोतमारा ता. मोताळा : 2, लोणार : 4, दहीफळ ता. लोणार : 1, बानापूर ता. लोणार : 2, खळेगांव ता. लोणार : 2, सुलतानपूर ता. लोणार : 4, नांदुरा : संभाजी नगर 2, महाराणा चौक 2, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, जयपूर लांडे ता. खामगांव : 1, खामगांव : चांदमारी 1, वामन नगर 2, जानकी कॉम्प्लेक्स 1, सुटाळा 2, जुना फैल 1, बाळापूर फैल 1, शिक्षक कॉलनी 3, पोलीस वसाहत 5, शंकर नगर 1, आठवडी बाजार 1, दे. राजा : बालाजी मंदीराजवळ 2, खाकपुरा 1, बायगांव ता. दे. राजा : 4, मेहकर : 3, विठ्ठल मंदीराजवळ 1, स्टेट बँके जवळ 1, आडोळ ता. जळगांव जामोद : 1, पळसखेड ता. जळगांव जामोद : 1, बुलडाणा : सुवर्ण नगर 1, साईनगर सागवण 1,शेगांव : 1, तीन पुतळाजवळ 1, शेलू ता. सिं. राजा : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 67 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 35 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मेहकर : 9, बालाजी नगर 1, डोणगांव ता. मेहकर : 2, घाटबोरी ता. मेहकर : 1, खामगांव : 2, सती फैल 3, आठवडी बाजार 1, वाडी 6, सिंधी कॉलनी 5, नवा फैल 4 येळगांव ता. बुलडाणा : 1.
तसेच आजपर्यंत 12320 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1160 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1160 आहे.
आज रोजी 171 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 12320 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1907 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1160 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 712 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

पिक विमा भरण्यास अडचणी मुदत वाढवून देण्याची मागणी…

nirbhid swarajya

लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी होणार

nirbhid swarajya

सामान्य रुग्णालयातील बंद पडलेली अग्निरोधक यंत्रणा त्वरित सूरू करा – जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे

nirbhid swarajya
error: Content is protected !!