85 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 436 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 322 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 114 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 102 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 218 तर रॅपिड टेस्टमधील 104 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 322 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, शेगांव शहर : 10, शेगांव तालुका : पहुरजीरा 1, जनोरी 1, चिंचोली 1, दे. राजा तालुका : दे. मही 5, कुंभारी 5, किन्ही पवार 1, बायगाव 1, गोंधनखेड 3, दगडवाडी 1, गारगुंडी 1, दे. राजा शहर : 10, लोणार तालुका : वेणी 1, हिरडव 2, मलकापूर शहर : 4, मलकापूर तालुका : हरणखेड 1, मेहकर शहर : 1, मोताळा तालुका : धा. बढे 1, टाकरखेड 1, निमखेड 1, मोताळा शहर : 1, चिखली शहर : 2, बुलडाणा तालुका : सावळी 1, दहिद 1, चंडोळ 1, तांदुळवाडी 1, वडगाव 1, कोलवड 1, बुलडाणा शहर : 20, नांदुरा तालुका : निमगांव 1, तरवाडी 1, नांदुरा शहर: 14, सिंदखेड राजा तालुका : साखर खर्डा 1, मेहकर तालुका : जनेफळ 1, डोणगाव 2, मूळ पत्ता टेंभुर्णी जि. जालना 1, रिसोड जि. वाशिम 1, किन्ही ता. जाफराबाद, जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 114 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 85 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : सिं.राजा तालुका : शेंदुर्जन 6, मोहाडी सवडत 10, गोंधणखेड 1, रताळी 1, चिखली तालुका : चांधाई 3, दे. घुबे 1, चिखली शहर : 5, खामगांव शहर : 9, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, डोणगाव 6, मलकापूर शहर : 10, मलकापूर तालुका : विवरा 1, कुंड बू 1, तालसवाडा 1, मोताळा तालुका : निपाना 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : टूनकी 1, वरवट बकाल 1, शेगाव शहर : 16, शेगाव तालुका : जवळा 1, आडसुळ 1, भोनगाव 1, मोताळा शहर : 3, मेहकर शहर : 3, मूळ पत्ता वाडेगाव जि. अकोला 1.
तसेच आजपर्यंत 25744 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4498 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4498 आहे.
आज रोजी 1793 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 25744 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5711 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4498 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1143 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 70 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post
next post