January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 322 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 53 पॉझिटिव्ह

50 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 375 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 322 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 77 तर रॅपिड टेस्टमधील 245 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 322 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद: 14, दुसरबिड ता. सिंदखेड राजा: 1, जळगाव जामोद: 4, शेगाव: देशमुख पुरा 2, माळीपुरा 2, धानोकर नगर 1, तीन पुतळा जवळ 1, उपजिल्हा रुग्णालय 1, बुलडाणा: चैतन्य वाडी 2, टिळक वाडी 2, विष्णुवाडी 1, हतेडी ता. बुलडाणा: 4, सुलतानपूर ता. लोणार: 8, जलंब ता. शेगाव: 1, खामगाव: 1, सुटाळा 1, सामान्य रुग्णालय वसाहत 2, गोपाल नगर 1, किसन नगर 1, वाडी 2, केशव नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे दे. मही ता. दे. राजा येथील 52 वर्षीय पुरूष व मलकापूर येथील एका 71 वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.


तसेच आज 50 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : भीमनगर 1, बजरंग नगर 1, काँग्रेस नगर 2, अमडापुर ता. चिखली : 1, भेंडवळ ता. जळगाव जामोद: 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, दे. राजा : चांदेश्वरी मंदिराजवळ 1, खामगाव: यशोधरा नगर 1, सुटाळा 3, रेणुका माता नगर 1, बाळापूर फैल 3, राठी प्लॉट 1, शेगाव: 1, ओम नगर 3, सरकारी फैल 1, मोदीनगर 1, माटरगाव ता. शेगाव: 3, येसापूर ता. लोणार: 1, घाटबोरी ता. मेहकर: 1, डोणगाव ता. मेहकर: 1, वाडी ता. जळगाव जामोद: 2, धाड ता. बुलडाणा : 1, नांदुरा: संभाजीनगर 5, महाराणा चौक 5, नागळकर ले आउट 1, अर्बन कॉलनी 1, आयटीआय जवळ 1, तहसील कार्यालय 1, सुलतानपूर ता. लोणार: 1, चिखली :2.
तसेच आजपर्यंत 13842 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1303 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1303 आहे.
आज रोजी 206 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13842 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2179 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1303 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 836 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगावात आढळले ४ कोरोना बाधित रुग्ण

nirbhid swarajya

वंचित कडून पीडितेस आर्थिक भरपाई देण्याची मागणी

nirbhid swarajya

खाजगी कोविड रुग्णालयातील १३ डॉक्टरानी दिले सामूहिक राजीनामे

nirbhid swarajya
error: Content is protected !!