November 20, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 313 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 118 पॉझिटिव्ह

29 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 431 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 118 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 113 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 107 तर रॅपिड टेस्टमधील 206 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: बुलडाणा शहर :6, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, शेगाव तालुका : नागझरी 1, बोडखा 1, सावरा 1, तिंत्रव 1, कठोरा 10, मनसगाव 1, जळंब 1, शेगाव शहर : 10, मेहकर तालुका: पांगरखेड 1, हिवरा आश्रम 1, उकळी 1, मेहकर शहर : 3, खामगाव शहर : 5, खामगाव तालुका : घाटपूरी 5, उमरा अटाळी 1, हिवरखेड 3, लोणार शहर: 1, जळगाव जामोद शहर :2, चिखली शहर: 8, चिखली तालुका : सवडत 1, सवना 2, वाघापूर 1, एकलारा 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेडा 12, लिंगा 2, सिंदखेड राजा शहर :1, नांदुरा शहर :16, नांदुरा तालुका: नारखेड 3, पिंपळखुटा धांडे 3, मलकापूर शहर: 3, मोताळा शहर :1, मोताळा तालुका : सावरगाव जहा 2, पोफळी 1, धानोरा 1, धा. बढे 1, चिंचोळा 1 तसेच मूळ पत्ता रिसोड जि वाशिम येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 118 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 5, आयुर्वेद महाविद्यालय 1, खामगाव : 1, दे. राजा :6, नांदुरा : 1, लोणार :4, जळगाव जामोद :2, चिखली :9,
तसेच आजपर्यंत 35593 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7823 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7823 आहे.
आज रोजी 471 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 35593 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8303 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7823 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 367 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

हिंदुराष्ट्र सेनेच्या बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष पदी सागर बेटवाल…

nirbhid swarajya

खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…

nirbhid swarajya

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!