January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 313 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 137 पॉझिटिव्ह

147 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 450 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 137 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 112 व रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 214 तर रॅपिड टेस्टमधील 99 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 25, खामगांव तालुका : बोर जवळा 5, जळका भडंग 2, शेगांव शहर : 11, शेगांव तालुका : पहुरजीरा 1, माटर गाव 2, दे. राजा शहर : 6, लोणार तालुका : सुलतानपूर 2, मलकापूर शहर : 4, मलकापूर तालुका : झोडगा 3, हिंगणा काझी 1, दाताला 1, मोताळा तालुका : धा. बढे 3, शेलापुर बू 1, खेडी 4, मोताळा शहर : 1, चिखली शहर : 12, बुलडाणा तालुका : मोहनखेड 1, आजिसपूर 1, अन्त्री 1, सागवान 2, बुलडाणा शहर : 4, नांदुरा शहर: 16, सिंदखेड राजा तालुका : वरोडी 4, आंबेवाडी 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, डोणगाव 3, देऊळगाव सकर्षा 1, धाराशिव 1, लोणार शहर : 1, चिखली तालुका : भानखेड 6, दे. घूबे 1, मेरा बू 1, सिंदखेड राजा : 2, संग्रामपूर तालुका : कवठळ 1, मूळ पत्ता वाडेगव जि. अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 137 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 56, मेहकर येथील 50 वर्षीय पुरुष आणि झोडगा ता. मलकापूर येथील 70, टेंभुर्णी जि. जालना येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 147 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले कोविड केअर सेंटर नुसार रूग्ण पुढीलप्रमाणे : सिं.राजा : 6, मलकापूर : 2, मेहकर : 3, संग्रामपूर : 4, लोणार : 3, शेगाव 15, जळगाव जामोद : 15, नांदुरा : 3, दे. राजा : 3, खामगाव : 54, बुलडाणा: 39.
तसेच आजपर्यंत 26057 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4645 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4645 आहे.
आज रोजी 1748 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 26057 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5848 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4645 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1129 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 74 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

डोंगराजवळ आढळले इसमाचे प्रेत; घातपाताचा संशय

nirbhid swarajya

क्वारंटाईन केलेल्या नागरीकांवरच उपासमारीची पाळी

nirbhid swarajya

धक्कादायक;पुन्हा एका मुख्याध्यापकाचे कु कृत्य आले समोर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!