April 3, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 307 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 80 पॉझिटिव्ह

42 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 387 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 307 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 80 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 129 तर रॅपिड टेस्टमधील 178 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 307 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर : 4 महिला, 3 पुरूष, लोणी गवळी ता. मेहकर: 6 पुरूष, 5 महिला,घाटबोरी ता. मेहकर : 3 पुरूष, नांदुरा : 1 पुरूष, 1 महिला, राम मंदीराजवळ 1 महिला, दबंगेपुरा 1 पुरूष, विदर्भ चौक 1 पुरूष, चिखली : 1 पुरूष, सवणा ता. चिखली: 9 पुरूष, 4 महिला, धाड ता. बुलडाणा: 4 महिला, 2 पुरूष, बुलडाणा : 1 पुरूष, 1 महिला, दे. मही ता. दे. राजा : 2 महिला, खामगांव : सती फैल 2 पुरूष, सुलतानपूरा 1 पुरूष, 1 महिला, देशमुख प्लॉट 2 मुली, 1 पुरूष, रेखा प्लॉट 3 महिला, 1 मुलगा, 1 पुरूष, बालाजी प्लॉट 2 पुरूष, 2 महिला, शेगांव रोड 1 पुरूष, शिवाजी नगर 1 पुरूष, 2 महिला, सिंधी कॉलनी 1 महिला, विनायक नगर 1 पुरूष, एकता नगर 1 महिला, माटरगांव ता. शेगांव : 1 पुरूष, दे. राजा : शिवाजी नगर 2 महिला, 2 पुरूष, सिव्हील कॉलनी 1 महिला, बावनबीर ता. संग्रामपूर : 1 महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 80 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 4 पुरूष, 2 महिला, शेगांव : 7 पुरूष, 3 महिला, नांदुरा : 1 पुरूष, जळगांव जामोद : 6 महिला, बुलडाणा: 4 महिला, 2 पुरूष, मलकापूर : 1 पुरूष, चिखली : 2 पुरूष, 1 महिला, खामगांव : 2 महिला, 7 पुरूष.
तसेच आजपर्यंत 9222 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 830 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 830 आहे.
आज रोजी 118 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 9222 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1348 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 830 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 488 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 30 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त ५ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत रोटरी क्लब तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

nirbhid swarajya

“त्या” कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह,कोरोनामुळे मुत्यु झाला नाही…

nirbhid swarajya
error: Content is protected !!