December 29, 2024
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 290 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह

50 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 342 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 290 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 33 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 97 तर रॅपिड टेस्टमधील 193 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 290 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : कळमेश्वर ता. मेहकर:1, मेहकर:4, खामगाव: शंकर नगर 1, सराफा 1, घाटपुरी नाका 1, एम आय डी सी परिसर 1, सती फैल 1, गोपाळ नगर 1, वाडी 1, चिखली 1, शेळगाव आटोळ ता. चिखली: 1, सोनेवाडी ता. चिखली : 4, पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद: 1, माळेगाव ता.मोताला : 1, बोराखेडी ता. मोताला :1, धामणगाव बढे ता. मोताळा: 2, हतेडी ता. बुलडाणा: 1, मोहोज ता. बुलडाणा:1, बुलडाणा: जोहर नगर 1, लहाने ले आउट 1, शिवाजी नगर 1, शेगाव: मोदी नगर 1, जलंब ता. शेगाव: 1, लोणार: 1, मलकापूर: जाधववाडी 5, दे. राजा: भगवान बाबा नगर 2, बालाजी नगर 1, उंबरखेड ता. दे. राजा :1, नांदुरा: शिवाजी नगर 4, हिवरखेड ता. सिंदखेड राजा: 3, मूळ पत्ता गोलोरे पार्क बावधन पुणे: 1, सिराजगाव जि. अमरावती : 1, अकोला 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 52 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 50 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा:3, तेलगू नगर 1, जिल्हा सामान्य रुग्णालय 1, इंदिरा नगर 1, धाड ता. बुलडाणा: 6, शेगाव : भैरव चौक 2, जळगाव जामोद: 1, लोणार: मापारी गल्ली 5, खळेगाव ता. लोणार: 1, बानापुर ता. लोणार: 3, दहिफळ ता. लोणार:1, सुलतानपूर ता. लोणार: 1, मेहकर:4, कळमेश्वर ता. मेहकर: 1, खामगाव:1, शिवाजी वेस 5, जुना फैल 3, जोशी नगर 2, पोलीस वसाहत 1, सुटाला 6, सती फैल 1.
तसेच आजपर्यंत 14132 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1353 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1353 आहे.
आज रोजी 168 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14132 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2231 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1353 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 838 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 40 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

चारचाकी वाहनाचा अपघात ३ जखमी ; १ मृत्यु

nirbhid swarajya

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मद्दतीकरीता गायगाव येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड…

nirbhid swarajya
error: Content is protected !!