October 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 286 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 41 पॉझिटिव


16 रूग्णांची कोरोनावर मात

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 329 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 286 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 41 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड टेस्टमधील 20 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 63 तर रॅपिड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 286 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : आडगांव राजा ता. सिं. राजा : 60 वर्षीय महिला, मेहकर : 60, 36 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर 82 वर्षीय महिला, लोणी गवळी ता. मेहकर : 15, 17, 18 वर्षीय महिला, डोणगांव ता. मेहकर : 60, 30, 6, 39, 56 वर्षीय पुरूष, 55, 30 वर्षीय महिला, जळगांव जामोद : चौबारा 29 वर्षीय पुरूष, दे. राजा : दुर्गापूरा 43 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ 31 वर्षीय पुरूष, असोला जहांगीर ता. दे. राजा : 45 वर्षीय पुरूष, 27, 42 वर्षीय महिला, खामगांव : महावीर चौक 34, 32, 29 वर्षीय पुरूष, सुटाळा 50 वर्षीय महिला, करवीर कॉलनी 66 वर्षीय पुरूष, केशव नगर 46 वर्षीय महिला, चिखली : 53, 20, 56, 2 वर्षीय पुरूष, 47, 49, 19, 34, 51,33, 55, 45 वर्षीय महिला, जनुना ता. खामगांव : 65 वर्षीय पुरूष, मलकापूर : 21 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 41 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 28, 45 वर्षीय पुरूष, मलकापूर : लख्खानी चौक 39 वर्षीय महिला, चिखली : आनंद नगर 32, 30 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 57 वर्षीय महिला, 70 वर्षीय दोन पुरूष, खामगांव : 38, 60 वर्षीय पुरूष, महावीर चौक 22, 50, 31 वर्षीय महिला, 39, 3 वर्षीय पुरूष, खालखेड ता. नांदुरा : 56 वर्षीय महिला.
तसेच आजपर्यंत 7751 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 688 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 688 आहे.
आज रोजी 184 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 7751 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1101 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 688 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 386 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 27 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

शेगाव येथून संग्रामपूर कडे जाणाऱ्या एसटी बसला कारची धडक

nirbhid swarajya

कोरोना व्हायरस बाबत घाबरून न जाता सतर्कता बाळगा व अफवा फैलवणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करणार ; उपविभागीय अधिकारी चव्हाण

nirbhid swarajya

एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी ए.के. नॅशनल हायस्कूलचा अपुर्व नाना हिवराळे पात्र…

nirbhid swarajya
error: Content is protected !!