January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 28 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 7 पॉझिटिव्ह

16 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 35 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 28 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 5 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 3 तर रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 28 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : 37 व 36 वर्षीय पुरुष, शेगाव रोड 30 वर्षीय पुरुष, टिळक मैदान – 50 वर्षीय पुरूष, शंकर नगर : 36 वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट 69 वर्षीय पुरुष, पिंपळगाव राजा तालुका खामगाव 39 वर्षीय पुरुष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपळगाव राजा तालुका खामगाव येथील 29 वर्षीय महिला, नांदुरा येथील 60 व 76 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, खामगाव येथील 25 वर्षीय पुरुष, जलालपुरा खामगाव येथील 42 वर्षीय पुरुष, 17 व 10 वर्षीय महिला, गांधी चौक खामगाव येथील 32 वर्षीय पुरुष, केला नगर खामगांव येथील 43 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला व 6 महिन्याची मुलगी, अमृत बाग खामगाव येथील 10 वर्षीय मुलगी, शिवाजी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, मंगल गेट मलकापूर येथील 66 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 8572 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 326 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 326 आहे. आज रोजी 253 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8572 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 703 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 326 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 357 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

बुलडाणा जिल्हात आता २१ कोरोना पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी आघाडीचा स्तुत्य़ उपक्रम

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये ही ते करतायेत गौ-सेवा

nirbhid swarajya
error: Content is protected !!