January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 259 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

9 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 323 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 259 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 41 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 84 तर रॅपिड टेस्टमधील 175 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 323 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा : विठ्ठल नगर 1, भावसार मंदीराजवळ 1, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 1, संकल्प कॉलनी 4, शिवाजी नगर 1, मेहकर : मँगो होस्टेलजवळ 1, संताजी नगर 1, विठ्ठल नगर 1, डोणगांव ता. मेहकर : 3, वडशिंगी ता. जळगांव जामोद : 1, आडोळ ता. जळगांव जामोद : 3, चिखली : 2, आनंद नगर 2, संभाजी नगर 1, वाल्मिकी नगर 1, शिंदी हराळी ता. चिखली : 2, बुलडाणा : शरद कला कॉलेज जवळ 4, जिल्हा रूग्णालय 1, बालाजी नगर सुंदरखेड 1, इंदिरा नगर 1, शिवाजी नगर 1, सुवर्णा नगर 1, खेडी पान्हेरा ता. मोताळा : 1, पिंपळगांव सराई ता. बुलडाणा : 5, मोहोज ता. बुलडाणा 7, मूळ पत्ता वालसावंगी ता. भोकरदन, जि. जालना 1, खामगांव : 1, जुना फैल 3, गजानन कॉलनी 1, राठी प्लॉट 4, सती फैल 2, मलकापूर : 2, सुलतानपूर ता. लोणार : 1, धा. बढे ता. मोताळा : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 64 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 9 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : इंदिरा नगर 1, जानेफळ ता. मेहकर : 1, दाताळा ता. मलकापूर : 1, चिखली : 2, बुलडाणा : 2, मलकापूर : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1.
त सेच आजपर्यंत 12320 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1160 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1160 आहे.
आज रोजी 116 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 12579 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1971 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1169 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 767 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी २० वर्हाडी समोर लावले लग्न

nirbhid swarajya

जीवनावश्यक दुकानांची वेळेमधे बदल

nirbhid swarajya

बाजार समितीतील संभाव्य प्रशासकांची यादी जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!