December 29, 2024
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 255 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 88 पॉझिटिव्ह

18 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 343 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 255 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 88 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 व रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 124 तर रॅपिड टेस्टमधील 131 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 255 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर: 2, इथापे ले आऊट 1, सुंदरखेड 1, चिखली तालुका : शेळगाव आतोळ 2, अंत्री खेडेकर 1, भालगाव 2, बुलडाणा तालुका : 1, सोयगाव 1, धाड 1, चिखली शहर: 18, शेगाव शहर: मटकरी गल्ली 1, पोलीस मुख्यालय 2, नागझरी रोड 1, शिवाजीनगर 1, दे. राजा तालुका: जवळखेड 1, बायगाव 2, मेंडगाव 4, नांदुरा तालुका: नायगाव 1, जळगाव जामोद तालुका: पिंपळगाव काळे 1, सिंदखेड राजा तालुका : शेंदुर्जन 2, दुसरबीड 1, देऊळगाव कोळ 1, वाघाळा 1, सिंदखेड राजा शहर : 13, मलकापूर शहर 2, गांधी चौक 1, दे. राजा शहर : खडकपुरा 2, मेहकर शहर: 1, लोणार शहर: 3, मेहकर तालुका : बरटाळा 1, संग्रामपुर तालुका: वानखेड 1, सोनाळा 1, मोताळा तालुका : धामणगाव बढे 1, जळगाव जामोद शहर: 1, खामगाव शहर: 1, आठवडी बाजार 1, नांदुरा रोड 1, विठ्ठल नगर 2, चांदमारी 1, घाटपुरी नाका 2, समता कॉलनी 1, सिंधी कॉलनी 2, चांदे कॉलनी 1 संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 88 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान जागदरी ता. बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरुष, जांभोरा ता. चिखली 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे: दे.राजा: 3, बुलडाणा: 7, जळगाव जामोद: 1, लोणार: 1, खामगाव : 4, नांदुरा : 2
तसेच आजपर्यंत 17545 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2124 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2124 आहे.
आज रोजी 915 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17545 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3071 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2124 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 899 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकत्रीकरण मंचातर्फे निवेदन

nirbhid swarajya

कोरोना वर मात करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयातून सुट्टी

nirbhid swarajya

कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून दिले शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक

nirbhid swarajya
error: Content is protected !!