196 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 377 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 253 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 124 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 104 व रॅपिड टेस्टमधील 20 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 136 तर रॅपिड टेस्टमधील 117 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 253 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 22, खामगांव तालुका : घाटपुरी 4, गोंधनापुर 2, बोर जवळा 11, नांदुरा तालुका: निमगाव 1, नांदुरा शहर: 2, मलकापूर तालुका: वाघुड 1, मलकापूर शहर: 3, लोणार तालुका: पंगरा डोळे 2, हिरदव 2, सुलतानपूर 1, लोणार शहर: 1, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 4, जळगाव जामोद शहर : 7, जळगाव जामोद तालुका : सुन गाव 1, बुलडाणा शहर: 25, बुलडाणा तालुका : पांग्री 2, डोंगर खंडाळा 2, चांडोल 1, धाड 1, साखळी 1, मोतला शहर : 1, मोतळा तालुका : धा. बढे 4, दे. राजा शहर: 5, दे. राजा तालुका : नारायण खेड 2, दे. मही 2, सुरा 1, धोत्रा 1, कुंभारी 1, पांगरी 1, चिखली शहर: 1, चिखली तालुका: दे. घुबे 1, शेलुद 1, सिंदखेड राजा तालुका: साखर खर्डा 1, गोरेगाव 1, गुंज 2, मेहकर शहर : 2, शेगाव शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 124 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील 81 वर्षीय पुरुष, चिखली रोड , बुलडाणा येथील 61वर्षीय पुरुष, शेलगाव दे. ता. मेहकर येथील 75 वर्षीय पुरुष, निमगाव ता. नांदुरा येथील 72 वर्षीय पुरुष आणि दे. घुबे ता. चिखली येथील 48 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 196 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, खामगाव : 29, शेगाव: 6, दे. राजा : 24, चिखली: 20, मेहकर : 5, मलकापूर : 18, लोणार : 8, संग्रामपूर : 4, जळगाव जामोद : 3, नांदुरा : 9, सिंदखेड राजा: 29, मोताळा : 6,
तसेच आजपर्यंत 27753 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5183 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5183 आहे.
आज रोजी 1345 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27753 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6268 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5183 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1004 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 81 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.