November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 236 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 30 पॉझिटिव्ह

42 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 266 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 236 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 120 तर रॅपिड टेस्टमधील 116 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 236 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 1, आनंद नगर 1, लहाने ले आऊट 1, गजानन नगर 1, इकबाल नगर 3, शेगांव : सुरभी कॉलनी 1, आदर्श नगर 1, हाय फाय कॉलनी 1, भुत बंगला जवळ 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, जयपूर लांडे ता. खामगांव : 1, दे. राजा : संजय नगर 5, शिंदी हराळी ता. चिखली : 1, मलकापूर : 1, बिबी ता. लोणार : 1, अंत्री खेडेकर ता. चिखली : 4, नांदुरा : शिवाजी नगर 1, खामगांव : घाटपुरी नाका 1, विठ्ठल नगर 1, वाडी 1, माफरीया नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 30 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे कुंभारवाडा खामगांव येथील एका 85 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.
तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बावनबीर ता. संग्रामपूर :2, वरवट बकाल ता. संग्रामपूर :1, बुलडाणा :1, संगम चौक 1, परदेशीपुरा 1, शेगांव : पोलीस स्टेशन 1, दे. राजा : 2, मस्जीदपुरा 1, साखरखेर्डा ता. सिं.राजा : 4, बोराखेडी बावरा ता. दे.राजा : 7, लोणार : 1, खामगांव : 1, इंदिरा नगर 2, शुक्ला ले आऊट सुटाळा 4, सुटाळा 2, मलकापूर : 1, नांदुरा : सिंधी कॅम्प 2, डवंगेपुरा 1, आठवडी बाजार 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, मिलींद नगर 2, आयटीआय जवळ 1, गोतमारा ता. मोताळा : 1.
तसेच आजपर्यंत 13013 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1232 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1232 आहे.
आज रोजी 70 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13013 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2029 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1232 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 761 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 36 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

शिक्षकेच्या त्रासाला कंटाळून ३२ वर्षे इसमाची आत्महत्या

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यातील प्राचीन मशिद

nirbhid swarajya

मेडीकल मधे चोरी करणाऱ्या एकास अटक ; गाडी जप्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!