January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 208 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 48 पॉझिटिव्ह

6 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 256 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 208 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 48 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 165 तर रॅपिड टेस्टमधील 43 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 208 अहवाल निगेटीव्ह आहेत.पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : दोषीनगर 50 वर्षीय पुरूष, शंकर नगर 48, 24, 20 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, भुसारी गल्ली 55 वर्षीय महिला, महावीर चौक 22, 31 व 50 वर्षीय महिला, 39 व 3 वर्षीय पुरूष, कृष्णपुरा सोसायटी 70 वर्षीय पुरूष, पुरवार गल्ली 44 वर्षीय पुरूष, सुटाळा 52 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, वाडी 13 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय महिला, शेगांव : 37 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला, बालाजी फैल 69 वर्षीय पुरूष, नांदुरा : 38 व 33 वर्षीय पुरूष, कृष्णा नगर 18 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 59, 57, 60 वर्षीय पुरूष, 55व 48 वर्षीय महिला, गैबा नगर 55 वर्षीय पुरूष, सिंधी कॉलनी 32 वर्षीय पुरूष, चिखली : 66 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, कालिंका मंदीराजवळ 40 व 20 वर्षीय महिला, शिवाजी नगर 69 वर्षीय पुरूष, पोलीस स्टेशनजवळ 43 वर्षीय महिला, आदर्श शाळेजवळ 2 वर्षीय मुलगा, बुलडाणा : 30 वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा : 22 वर्षीय महिला, डोणगांव ता. मेहकर : 22 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 36, 35 व 58 वर्षीय महिला, 57, 79 व 5 वर्षीय पुरूष, दे. राजा : 65 व 32 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 48 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे आज दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये खामगांव येथील 57 वर्षीय पुरूष व अहिंसा मार्ग, दे. राजा येथील 55 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आज 6 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा : 75 वर्षीय पुरूष, ओम नगर 40 वर्षीय महिला, माळीपुरा 51, 34 वर्षीय पुरूष, चिखली : माळीपुरा 26 वर्षीय पुरूष, मलकापूर : लक्ष्मी चौक 47 वर्षीय पुरूष,बुलडाणा : मुठ्ठे लेआऊट 32 वर्षीय पुरूष रूग्ण अकोला रेफर करण्यात आला आहे.
तसेच आजपर्यंत 6475 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 437 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 437 आहे. आज रोजी 252 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6475 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 834 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 437 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 373 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 24 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग ; दोन लाखाचे नुकसान

nirbhid swarajya

बुलडाणा नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

nirbhid swarajya

दोन गटात तुफान हाणामारी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!