36 रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 242 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 200 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 39 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 142 तर रॅपिड टेस्टमधील 58 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 200 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर : शिवाजी नगर 55 वर्षीय पुरूष, हिवरा आश्रम ता. मेहकर : 40 वर्षीय पुरूष, चिखली : गांधी नगर 4, 45, 17 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, पोलीस स्टेशन जवळ 35 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, माळीपुरा 21 वर्षीय महिला, बागवान पुरा 30 वर्षीय पुरुष, नांदुरा : गैबी नगर 47 व 28 वर्षीय महिला, 35 व 39 वर्षीय पुरुष, आठवडी बाजार 55 वर्षीय महिला, राम मंदिराजवळ 34 वर्षीय पुरुष, येरळी ता. नांदुरा 35 वर्षीय पुरुष, चांदुर बिस्वा त. नांदुरा : 40 वर्षीय महिला व 10 वर्षीय मुलगा, लोणी गवळी त. मेहकर: 42, 25, 27,52 वर्षीय पुरुष, 42, 45, 40, 42 वर्षीय महिला, अंजनी बु. त. मेहकर: 30 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, डोनगाव त. मेहकर: 20 वर्षीय पुरुष, मेहकर: 53 वर्षीय पुरुष, रामनगर 63 वर्षीय महिला, दे. राजा: 49, 50,45, 39, 12, 24 वर्षीय पुरुष, 37 व 40 वर्षीय महिला, किनगाव राजा ता. सिंदखेड राजा : 36 वर्षीय महिला, आळंद त. दे. राजा: 68 वर्षीय महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 36 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगाव : बाळापूर फैल 65, 28, 15, 21, 38, 85 वर्षीय महिला, 20, 30, 25, 5, 11, 35, 10 वर्षीय पुरुष, नवा फैल 63, 17, 55 महिला, 75, 74, 80 वर्षीय पुरुष, जुना फैल 40 व 56 वर्षीय महिला, कोठारी प्लॉट 27 वर्षीय पुरुष, केला प्लॉट 40 वर्षीय पुरुष, टिळक मैदान 50 वर्षीय पुरुष, अग्रसेन चौक 72 वर्षीय पुरुष, रेखा प्लॉट 30 वर्षीय पुरुष, जळंब नाका 42 वर्षीय महिला, जळगाव जामोद : 40 वर्षीय पुरुष, 36, 45 व 13 वर्षीय महिला, शेगाव : 61 वर्षीय पुरुष, एसबीआय कॉलनी 26 वर्षीय दोन महिला, उमेश नगर 24 वर्षीय महिला, एक 55 वर्षीय पुरुष.
तसेच आजपर्यंत 6895 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 515 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 515 आहे.
आज रोजी 192 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6895 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 915 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 515 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 376 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 24 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.