21 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 226 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 198 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 तर रॅपिड टेस्टमधील 161 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 198 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे.राजा : खडकपूरा 1, महात्मा फुले रोड 2, संजय नगर 1, दे. मही ता. दे. राजा : 1, दुसरबीड ता. सिं. राजा : 2, सुलतानपूर ता. लोणार : 2, ठालेगांव ता. लोणार 1, बुलडाणा : 1, बालाजी नगर सुंदरखेड 2, धा. बढे ता. मोताळा : 1, शेगांव : 1, दाताळा ता. मलकापूर : 1, मलकापूर : शक्ती नगर 4, खामगांव : शिवाजी वेस 2, शासकीय रूग्णालय क्वार्टर 1, कुंभारवाडा 1, खती ले आऊट 1, सुटाळा 1, जगदंबा रोड 1, अमृत नगर 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 28 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 21 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मलकापूर : 1, पंत नगर 1, डोणगांव ता. मेहकर : 1, दाताळा ता. मलकापूर : 1, शेगांव : ब्राम्हणवाडा 2, बुलडाणा: जोहर नगर 1, विष्णूवाडी 2, लोणार : 1, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना : 1, दिवठाणा ता. चिखली : 1, खामगांव : देशमुख प्लॉट 2, सती फैल 2, रेखा प्लॉट 3, दे. राजा : 1, मेहकर : 1.
तसेच आजपर्यंत 12777 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1190 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1190 आहे.
आज रोजी 135 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 12777 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1999 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1190 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 774 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.