77 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 205 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 163 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 35 व रॅपिड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 65 तर रॅपिड टेस्टमधील 98 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 163 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : किसन नगर 2, वाडी 2, सुटाळा 2, गांधी चौक 1, जगदंबा रोड 1, गौरक्षण रोड 1, अनिकेत रोड 1, शंकर नगर 2, देशमुख प्लॉट 2, भालेगांव बाजार ता. खामगांव : 7, पिं.राजा ता. खामगांव : 3, माक्ता कोक्ता ता. खामगांव : 1, शेगांव : पंचशील नगर 3, सदगुरू नगर 4, आळसणा ता. शेगांव : 1, हिवरखेड ता. सिं. राजा : 2, निमखेड ता. जळगांव जामोद : 1, बुलडाणा : 3, विजय नगर 1, किन्ही सवडत ता. चिखली : 1, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 77 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद : रामनगर वाडी 1, चौबारा 1, राणी पार्क 2, नांदुरा : विदर्भ चौक 1, विठ्ठल मंदीराजवळ 1, नांदुरा खुर्द 1, चिखली : 2, शिक्षक कॉलनी 2, बगीचाजवळ 1, दुध डेअरीजवळ 1, आनंद नगर 1, डिपी रोड 2, बुलडाणा अर्बन बँकजवळ 1, नगर परिषद कार्यालयाजवळ 5, दे. राजा : 4, सिव्हील कॉलनी 2, अहिंसा मार्ग 3, संजय नगर 5, मलकापूर : 1, भालेगांव बाजार ता. खामगांव : 1, पिं. राजा ता. खामगांव : 1, खामगांव : 4, प्रशांत नगर 1, बाळापूर फैल 2, शेगांव रोड 1, शंकर नगर 1, बालाजी प्लॉट 1, पोलीस वसाहत 1, बालाजी फैल 6, फरशी रोड 1, सिवील लाईन 2, यशोधरा नगर 1, सुटाळा खुर्द 3, वाडी 3, तिरूपती नगर 1, देशमुख फैल 1, महबूब नगर 1, शेगांव : देशमुखपुरा 1, झमझम कॉलनी 1, मूळ पत्ता शिपोरा ता. भोकरदन जि. जालना 1, नांदुरा : 1, पोलीस वसाहतीमागे 1, कृष्णा नगर 1, बुलडाणा : नक्षत्र अपार्टमेंट 2.
तसेच आजपर्यंत 14733 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1571 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1571आहे. आज रोजी 295 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 14733 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2437 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1571 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 825 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.