January 6, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 145 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 31 पॉझिटिव्ह


32 रूग्णांची कोरोनावर मात,


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 176 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 145 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 31 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 26 व रॅपिड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 79 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 145 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगाव जामोद : 1, 35, 30 वर्षीय पुरूष, 22, 80 व 45 वर्षीय महिला,राणी पार्क 41 वर्षीय महिला व 47 वर्षीय पुरुष, चिखली : 35, 40, 27, 40, 65, 42 व 4 वर्षीय पुरुष, 15, 32 व 62 वर्षीय महिला, बुलडाणा तालुका : 5 वर्षीय मुलगा, साखर खर्डा ता. सिंदखेड राजा : 55 वर्षीय पुरुष, शेगाव: मुरारका हायस्कूल जवळ 22 वर्षीय पुरुष, जमजम कॉलनी 34 वर्षीय पुरुष, किनगाव राजा ता. सि. राजा : 33 वर्षीय पुरुष, खामगाव: 63 58 वर्षीय पुरुष, महबुब नगर 33 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, चांदमारी 42 वर्षीय पुरुष, तिरुपती नगर 57 वर्षीय पुरुष, पहूर जिरा ता. शेगाव : 45 वर्षीय पुरुष, नांदुरा: 68 वर्षीय महिला, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 31 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : हिवरखेड ता. लोणार : 18 वर्षीय महिला, सिनगाव जहागीर ता. दे. राजा : 45 वर्षीय पुरुष, दे. राजा : जुना जालना रोड 45 वर्षीय पुरूष, मलकापूर: शिवाजी नगर 45 व 28 वर्षीय पुरुष, नांदुरा: 34, 41 व 44 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, डोंगर खंडाळा ता. बुलडाणा : 33 वर्षीय पुरुष, शेगाव: टीचर कॉलेनी 30 वर्षीय महिला, एस बी आय कॉलनी 31 वर्षीय पुरुष, जळगाव जामोद: 65 व 57 वर्षीय पुरुष, सुलतानपूर ता.लोणार : 35 व 6 वर्षीय पुरुष, चिखली :42 व 33 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महिला, डोन गाव ता. मेहकर : 35 व 28 पुरुष , 52 व 3 वर्षीय महिला, मेहकर: सावजी गल्ली 24 वर्षीय पुरुष, वडगाव माळी ता. मेहकर: 35, 54, 30, 71, 29, 35 व 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष रूग्ण.
तसेच आजपर्यंत 6267 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 430 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 430 आहे.
आज रोजी 241 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6267 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 786 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 430 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 334 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 22 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आता रविवारलाच संचारबंदी

nirbhid swarajya

विहिरीत आढळला युवक- युवती चा मृतदेह!

nirbhid swarajya

सैनिकांसाठी प्रॉपर्टी संदर्भात विनामूल्य सेवा

nirbhid swarajya
error: Content is protected !!