3 रूग्णांची कोरोनावर मात, मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किट्स द्वारे प्राप्त अहवालांपैकी 159 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 142 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्रयोगशाळेतून प्राप्त 65 व रॅपिड टेस्टमधील 94 असे एकूण 159 अहवाल प्राप्त आहे. त्यामध्ये प्रयोगशाळेतील 49 निगेटीव्ह, तर रॅपिड टेस्टमध्ये 93 निगेटीव्ह आहेत. तसेच प्रयोगशाळेतील अहवालात 16 पॉझीटीव्ह व रॅपिडमध्ये 1 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहे.प्रयोगशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये खामगाव येथील 21 व 65 वर्षीय महिला, जळगांव जामोद येथील 50 वर्षीय पुरूष, पिं. राजा ता. खामगांव येथील 29 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 29 व 61 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 38, 34 व 60 वर्षीय महिला, 38 व 18 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगी, 9 वर्षीय मुलगा, शिक्षक कॉलनी शेलूद ता. चिखली येथील 52 वर्षीय पुरूष, गुंजाळा ता. चिखली येथील 70 वर्षीय पुरूष, दुर्गानगर दे.राजा येथील 60 वर्षीय महिला संशयीत रूग्णांच्या अहवालाचा समावेश आहे.त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इदगाह मैदान शेगांव येथील 65 वर्षीय महिला रूग्ण व मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 3 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोलार ता. चिखली येथील 67 वर्षीय महिला, धोत्रा भनगोजी ता. चिखली येथील 50 वर्षीय पुरूष व फाटकपुरा खामगांव येथील 78 वर्षीय वृद्ध पुरूषाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत प्रयोगशाळेतून व रॅपिड टेस्टद्वारे 3429 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 204 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 204 आहे. आज रोजी 311 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3429 आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 360 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 204 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात प्रयोशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालातील 125 व रॅपिड टेस्ट किटमधील 16 अशाप्रकारे 141 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.