54 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 136 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 113 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 21 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 99 तर रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 113 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दसरखेड : 1, बुलडाणा : 3, चिखली : 1, भालगांव ता. चिखली : 1, लोणार : 2, बिबी. ता लोणार : 1, दे. राजा : 9, शेगांव : सदगुरू नगर 1, गजानन सोसायटी 4, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 23 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज बिबी ता. लोणार येथील 38 वर्षीय पुरूष व्यक्तीचा उपचारादम्यान आज मृत्यू झाला आहे.
तसेच आज 54 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2, मच्छी ले आऊट 1, सरस्वती नगर 2, लांडे ले आऊट 1, संगम चौक 1, युनीयन बँक अपार्टमेंट 1, जुना गाव 2, सुवर्ण नगर 3, जिल्हा न्यायालय 2, शासकीय सामान्य रूग्णालय 1, टिळकवाडी 1, धाड ता. बुलडाणा : 1, खरबडी ता. मोताळा : 3, मोताळा : 1, ग्रामीण रूग्णालय 3, खामगांव : इंदिरा नगर 1, देशमुख प्लॉट 2, सिंधी कॉलनी 2, गोतमारा ता. मोताळा : 2, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 3, शेगांव : भैरव चौक 1, सोनेवाडी ता. चिखली : 1, मलकापूर : 1, पिं. काळे ता. जळगांव जामोद : 9, जानेफळ ता. मेहकर : 1, दुसरबीड ता. सिं. राजा : 1, बोराखेडी ता. मोताळा : 1, धा. बढे ता. मोताळा : 1, सुलतानपूर ता. लोणार : 1, मावंदीर ता. संग्रामपूर : 1, लोणार : 1.
तसेच आजपर्यंत 15147 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1688 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1688 आहे.
आज रोजी 587 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15147 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2580 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1688 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 850 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.