January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 1066 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 65 पॉझिटिव्ह

84 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1131 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1066 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 604 तर रॅपिड टेस्टमधील 462 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1066 अहवाल निगेटीव्ह आहेत.


पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : खैरव 1, देऊळगांव धनगर 1, गोदरी 3, एकलारा 1, चिखली शहर : 4, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : उबाळखेड 1, चांडोळ 2, वरवंड 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : सारशीव 1, नांदुरा तालुका : टाकरखेड 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सताळी 3, आसलगांव 1, सिं. राजा तालुका : आडगांव राजा 2, खामगांव तालुका : किन्ही 1, आंबेटाकळी 8, लांजुड 1, हिंगणा कारेगांव 1, दे. राजा शहर : 6, शेगांव शहर : 2, शेगांव तालुका : जवळा 1, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : निमगांव 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, पळसखेड चक्का 1, सिं. राजा शहर : 2, मोताळा तालुका : आडविहीर येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 65 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान चौबारा चौक, जळगांव जामोद येथील 70 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज 84 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 20, खामगांव : 6, लोणार : 3, शेगांव : 5, सिं. राजा : 8, मेहकर : 17, जळगांव जामोद : 4, संग्रामपूर : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 1, आयुर्वेद महाविद्यालय 11, मोताळा : 3.
तसेच आजपर्यंत 48122 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8995 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8995 आहे.
आज रोजी 2885 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 48122 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9578 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8995 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 456 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 127 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्याचे निवेदन

nirbhid swarajya

बुलडाणा रोडवर अपघात ; एकाचा मृत्यु

nirbhid swarajya

वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका

nirbhid swarajya
error: Content is protected !!