बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी १३ अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यापैकी ११ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ०२ अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेले अहवाल नांदुरा येथील ४५ वर्षीय महिला व खामगाव येथील ३१ वर्षीय पुरुषाचा आहे. आतापर्यंत १२८५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६९ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत ४३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ४३ आहे. सध्या रूग्णालयात २३ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज २ जुन रोजी १३ अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ४६ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १२८५ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.