April 11, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

जिल्ह्यातील ९७ अधिकारी उद्या सामूहिक रजेवर

बुलडाणा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला व आरोपींविरुद्ध कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी एकवटले असून, उद्या २ फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामधे तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी होणार आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ९७ अधिकारी रजेवर जाणार असल्याने महसूलचे कामकाज ठप्प होणार आहे. नायब तहसीलदार पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर २३ जानेवारीला रेतीमाफिया व त्याच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

त्यांच्यावर २४ जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. यामुळे महसूल अधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक झाली आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी संवर्गातील अधिकारी देखील पुढे सरसावले आहेत. याकरिता तहसीलदार सुरेश बगळे, खडसे, ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. त्यानुसार 2 फेब्रुवारीला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी सामूहिक रजेवर जाणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांसह १२ उपजिल्हाधिकारी, २१ तहसीलदार, ६४ नायब तहसीलदार मिळून ९७ अधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.त्यामुळे सामान्य नागरिकाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 309 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 91 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

बोलेरो जिपचे टायर फुटल्याने जिप पलटी एक ठार तिन गंभीर..

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 512 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 196 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!