अलगीकरणात ३१ दाखल, कोरोना बाधीत चार रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार
बुलडाणा : जिल्ह्यात आज ७० गृह विलगीकरणातून नागरिकांनी आपला १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले आहे. तसेच गृह विलगीकरणामधे आज ३० नागरिकांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणातून ९३ नागरिक आहेत. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून आज ३० नागरिकांना सुटी देण्यात आली. यामध्ये आज ३ नागरिकांची वाढ झाली असून सद्यस्थितीत ५३ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
तसेच बुलडाणा अलगीकरण कक्षात २८ मार्च रोजी मृत पावलेल्या कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना बाधीत आल्या होत्या. त्यांना अलगीकरणात आता १४ दिवस पूर्ण होत असून त्यांचे नमुने आज प्रयोगशाळेत पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यांचा रिपोर्ट कदाचित उद्या मिळणार आहे. सुदैवाने हे चारही रिपोर्ट निगेटीव्ह आले पाहिजे. त्यानंतर पुन्हा २४ तासाच्या अंतराने त्यांचा रिपोर्ट पाठविण्यात येईल. जर तेव्हाही रिपोर्ट निगेटीव्ह आले, तर त्यांना अलगीरकरणातून सुटी देण्यात येईल, अशी माहिती प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे. काल दि. १२ एप्रिल २०२० पर्यंत १३४ भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. संस्थात्मक विलागिकरणात आज तीन नागरिकांची भर पडली आहे. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण ५३ नागरिक आहेत.
जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात आज एकही संशयीत दाखल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात १, बुलडाणा १८ व शेगांव येथे १२ व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ३१ व्यक्ती अलगीकरणात आहेत. घरीच स्वतंत्र खोलीत १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत १४५ नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत १६२ नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज एकही सुटी देण्यात आली नाही. आजपर्यंत ४१ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील १९ , शेगांव ११ व खामगांव येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण २४८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज एकही नमुना पाठविण्यात आले आहे. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी १९१ नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १७ पॉझीटीव्ह व १७४ निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच ५७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
सौजन्य – Dio buldana