देवेंद्र देशमुख मित्र मंडळाचा पुढाकार
खामगाव : कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी २३ मार्च पासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षण व इतर कारणासाठी मोठ्या संख्येने खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपुर, मलकापुर येथील विद्यार्थी, मजूर व काही नागरिक पुणे येथे गेलेले असल्याने ते लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकले होते अश्यांना देवेंद्र देशमुख मित्र मंडळाने स्वगृही परतण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते त्या प्रमाणे या आवाहनाला प्रतिसाद देत ३५ विद्यार्थी व मजूर यांनी संपर्क साधून आपले नाव नोंदवले व त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी पुढाकार घेऊन स्व खर्चाने या ३५ विद्यार्थी व नागरिकांना परत आपल्या गावी आणण्याची जबाबदारी घेऊन त्यांनी काल दि.१८ मे रोजी खामगाव येथून एक खाजगी वाहन सेनीटाईज करून पुणे येथे पाठवले व ते वाहन आज जिल्ह्यातील विद्यार्थी, मजूर व नागरिकांना घेऊन खामगाव येथे पोहचले असता सर्वप्रथम त्या ३५ जणांना खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे तपासणी साठी घेऊन गेले व सर्वांची तपासणी झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले आहे.
आपल्या जिल्ह्यात परत आल्यावर त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहायला मिळाले व खामगाव येथे आल्यावर त्या सर्व विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी देवेंद्र देशमुख यांचे आभार व्यक्त केले. या वेळी देवेंद्र देशमुख, विश्वनाथ झाडोकार,डॉ. सदानंद इंगळे,दिलीप पाटील,वीरेंद्र झाडोकार, भरत लाहुडकार आदी उपस्थित होते.