December 29, 2024
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

जिल्ह्यातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प खामगावात साकारणार

खामगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत खामगावातील गोयनका ग्रुप ने ब्रिजगंगा ऑक्सी इंडस्ट्रीच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिला खाजगी ऑक्सीजन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन नंदकिशोर गोयनका व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत जनुना येथे पार पडला. येत्या दीड महिन्याच्या आत या प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. येथील गोयनका ग्रुपच्या जनुना शिवारातील जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ७ क्युबिक मीटरचा साठा असलेल्या ५०० सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे दररोज ३५०० क्युबिक मीटर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये आहे. कोरोना महामारीत जिल्ह्यात दररोज ६०० ते ७०० सिलेंडरची गरज भासत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये अकोला, जालना, जळगाव खान्देश, इथून ऑक्सीजन सिलेंडर चा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात आता हा पहिलाच प्रकल्प सुरू होत असल्याने जिल्ह्यातील ऑक्सिजनची टंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी गोयनका ग्रुपने युनिव्हर्सल बोसी कंपनीची मशीन राजस्थान भिवाडी येथून घेतली आहे. खामगाव शहरातून जिल्ह्याला होणारा हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहे, तरी या प्रकल्पामुळे खामगाव शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. ऑक्सीजन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न गोयनका ग्रुप कडून केल्या जात आहे.अशी माहिती गोयनका ग्रुपचे नंदकिशोर गोयनका यांनी दिली आहे.

Related posts

आता यापुढे ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थ उपस्थित राहू शकतात

nirbhid swarajya

‘सूर्यपुत्रा’ची कथा मोठ्या पडद्यावर

nirbhid swarajya

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा….

nirbhid swarajya
error: Content is protected !!