December 28, 2024
जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यातील आज प्राप्त पाच रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

गृह विलगीकरणात 36 नागरिकांची वाढ

बुलडाणा : जिल्ह्यात आज पाच रिपोर्ट प्राप्त झाले असून पाचही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.  त्याचप्रमाणे आज 20 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज गृह विलगीकरणात 36 नागरिकांची वाढ झाली आहे. ही संख्या आता 121 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.        
     काल दि. 14 एप्रिल  पर्यंत 93 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. त्यामध्ये आज 36 ने वाढ झालेली आहे. तसेच 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झालेल्या कुणाचीही आज 8 नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे.  संस्थात्मक विलगिकरणातून आज 22 नागरिकांची मुक्तता करण्यात आलेली आहे.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 29 नागरिक आहेत.
     जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात आज चार व्यक्ती दाखल करण्यात आलेल्या आहे.  सद्यस्थितीत  खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 3, बुलडाणा 26 व शेगांव येथे 2 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत.   घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 153 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 186 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज  सुटी देण्यात आली नाही. आजपर्यंत 51 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 19 , शेगांव 11 व खामगांव येथील 21 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 280 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज 20 नमुने पाठविण्यात आले आहे.  एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 250 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 21 पॉझीटीव्ह व  229 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच 30 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सौजन्य – Dio Buldana

Related posts

कृषी केंद्र चालकांनी कृषि निविष्ठांचे दर व साठ्याचा फलक लावावा – पालकमंत्री

nirbhid swarajya

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

nirbhid swarajya

30 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

nirbhid swarajya
error: Content is protected !!