बुलडाणा : संपुर्ण जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं सावट आलं आहे. देशामधे कोरोना रुग्णांची संख्या ही ४६ टक्क्यावर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा रुग्णाच्या वाढीमुळे भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर सोबतच कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्याची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना पेशंटचा आकडा वाढत आहे. व कोरोनाने मृत्यु होणाऱ्याचे प्रमाण अधिक होताना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा असेच काहीसे चित्र पहायला मिळत आहे. मात्र या कोरोनाच्या कठीण काळात स्वतः ला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आपल्या मतदार संघात फिरकले सुद्धा नाहीत. खरेतर कोविडच्या काळात नेहमीप्रमाणे खासदार जाधव हरवले होते. बुलडाणा शहरात सुद्धा पक्षाची मिटिंग किंवा पक्षाचे कार्यक्रमाला मात्र खासदार आपल्या ताफ्यासह हजर असतात. बाकी जिल्ह्यातील खासदार आपल्या मतदार संघाचा दौरा करुन लोकांना कोरोना काळात येणाऱ्या अडचणीची दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जिल्ह्याचे खासदार निवडणुक झाली तेव्हा पासून खामगांव मधे सुद्धा फिरकले सुद्धा नाहीतच आणि खामगांव मधे आलेच तर फक्त मोठ्या व्यापाऱ्यांच्या येथे भेट देतात व काही जमीनी खरेदी विक्री संबंधित काम असल्यास खामगांव मधे येतात अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत. खामगांव मतदार संघात कुठल्या समस्या आहेत ह्याची माहिती सुद्धा त्यांना नसतेच व कुठलेही विकासकाम सुद्धा केले नाहीत अशी ओरड खामगांवसह इतर तालुक्यामधील नागरिक करत आहेत. जिल्ह्यातील बाकी मतदार संघात खासदार प्रतापराव जाधव हे गेल्या नसल्याने हिच परिस्थिती तिथे सुद्धा पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहेत त्या गरजा सुद्धा पुर्ण करताना दिसत नाहीत. अनेक कोव्हिड सेंटरमध्ये बेड आणि ऑक्सिजनसह औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना बाधितांचे नातेवाईक रूग्णांच्या उपचारासाठी टाहो फोडत असून एकंदर विदारक चित्र बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झालेले असतानाच मतांचा जोगवा मागून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे खासदार प्रतापराव जाधव गायब झाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर बळींची संख्या सुद्धा वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या सुद्धा वाढताना दिसून येत आहे. अनेक रूग्णांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळणे अत्यावश्यक बनले आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने जिल्ह्यातील काही नागरिकांचा बळी गेला आहे. तालुक्यात अनेक कोव्हिड सेंटरची उभारणी केली असली तरी अनेक ठिकाणी ‘चणे आहेत तर दात नाही’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे साहित्याची कमतरता असल्याने अत्यवस्थ रूग्णांचीही संख्या वाढत आहे. रूग्णांचे नातेवाईक अडथळ्यांची शर्यत पार करून रूग्णासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत.अनेक ठिकाणी कोरोनाच्या काळात माणुसकीचे झरे वाहताना दिसत अनेक ठिकाणी खासदार यांनी मोफत कोविड सेंटर उभारली आहेत. मात्र जिल्ह्याचे खासदार यांनी त्यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यात मोफत कोविड सेंटर केव्हा उभारणार असा प्रश्न नागरिक सोशल मीडिया व खाजगीत चर्चा करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात एकीकडे लस, इंजेक्शन, ऑक्सीजनचा तसेच रेमडीसीवरचा तुटवडा, निर्माण झाला आहे. तर एकीकडे रेमडीसीवर चा काळाबाजार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्येक तालुक्यातील आढावा घेणे गरजेचे होते मात्र ते स्वतः च्या मतदार संघात तर नाहीच जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात फिरकले सुद्धा नाहीत. अशावेळी जिल्ह्यातील खासदार नागरिकांपासून चारहात दूर राहून रूग्णांची तडफड पहात आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन दारोदारी मतांचा जोगवा मागणार्या खासदारानी या महामारीत जनसेवेकडे पाठ फिरविली आहे. केंद्रा कडून आपल्या जिल्ह्याला मदत मिळवून देण्यासाठी खासदारानी प्रयत्न केले पाहिजे असते, मात्र तसे पाहिले तर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार जाधव हे जिल्ह्याला कोणतेही नियोजन किंवा कोरोना रुग्णाना मदत करताना सुद्धा दिसत नाही आहे. जिल्ह्यात होणाऱ्या आढावा बैठकी, असो की कोरोना संदर्भात नियोजन बैठक.. याला खासदारानी पाठ फिरवली आहे. केंद्राकडे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्यासाठी कोणती मदत मागण्याचे पत्र दिल्याच्या बातम्या सुद्धा कोणत्याही वृत्तपत्रात आल्याचे दिसले नाही. सोबतच आरोग्यविषयक कार्य सुद्धा करताना खासदार महोदय दिसत नाही आहेत. रेल्वे प्रश्नावर नेहमी लोकसभेत आक्रमकता दाखवनारे वजिल्ह्यात त्यावर वाहवाही करुन घेणारे खासदार कोरोना मधे नॉट रिचेबल झालेले दिसत आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र,स्वतः ला शेतकरी पुत्र म्हणवनारे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याकडेच पाठ फिरविल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जिल्ह्यात खासदार दाखवा….अन् बक्षीस मिळवा, अशी घोषणाबाजी करण्याची वेळ नागरिकांवर येणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्याला खासदार आहेत की नाही हे सुद्धा आता लोक विसरत आहेत. या कोरोना काळात जर खासदारानी जिल्ह्याकडे लक्ष देऊन समस्या जाणुन घेतल्या नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार दुर्लक्षित करुन मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. खासदारांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडला असल्याचे सुद्धा चर्चा सुरू आहे.
previous post
next post