मॅरेथॉन स्पर्धेला परवानगी दिली कोणी ?
खामगांव :कोरोना, डेल्टा, ओमिक्रोनच्या माध्यमातून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाकडून सामान्य नागरिकांसाठी अनेक निर्बंध लावण्यात येत आहे. कोरोना विषयक निर्देशांचे पालन न करता मनमानी पद्धतीने गर्दी करणाऱ्या जिल्हा वासीयांकरीता अखेर जिल्हा प्रशासनाने नवीन वर्षाच्या एक दिवस अगोदरच नवीन नियमावली टाकली आहे. सदरचे आदेश निर्गमित करण्यात आले असून याची ३१ डिसेंबर पासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने राजकीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रमातील उपस्थिती ला लगाम लावला आहे. यामुळे आता राजकीय सामाजिक व धार्मिक कार्यक्रम मिळावे केवळ ५० जणांच्या उपस्थितीत आयोजित करावी लागणार आहे असे सांगितले होते. बंदिस्ती व खुल्या अशा दोन्ही जागांसाठी ही ५० जणांची मर्यादा लागू आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांना उपस्थित राहता येणार आहे. याशिवाय पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने, गर्दीची ठिकाणे, आदी स्थळी संचारबंदी अर्थात १४४ लागू करण्यात आली आहे. मात्र खामगाव शहरातील रोटरी क्लब या संस्थेच्या वतीने पोलीस व प्रशासनाची परवानगी नसतांना सुद्धा नियम निर्बंध धुडकावून भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात विविध राज्यातील विविध शहरातील अंदाजे हजार वेगवेगळ्या गटातील स्पर्धकांची उपस्थिती होती. या वेळी प्रत्येक स्पर्धकाकडून या रोटरी क्लब संस्थेने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फी सुद्धा घेतली होती. विशेष म्हणजे काँग्रेस भवन येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आयोजक पासून ते स्पर्धकांपर्यंत कोणीही मास्क लावला नव्हता. स्पर्धा घेत असतांना त्या ठिकाणी कोरोना बाबतीतचे कुठल्याही प्रकारचे नियमाचे पालन करण्यात आले नव्हते व जनजागृतीपर कुठलेही त्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले नव्हते. रोटरी क्लब तर्फे शेगाव रोडवरील बस डेपो जवळ रस्त्याच्या मधोमध कमान लावण्यात आली होती रात्रीच्या वेळी या कमानी मुळे मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता होती. रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी रस्त्याच्या मधोमध कमान लावण्याची परवानगी नगरपरिषद कडून देण्यात आली होती का कि या ठिकाणीसुद्धा नियम पायदळी तुडवत आले होते हे सुद्धा पहावे लागेल.
महत्वाची बाब म्हणजे या आयोजनासाठी पोलिस प्रशासनाने परवानगी दिलीच कशी ? ही आयोजकांनी विना परवानगीनेच ही स्पर्धा आयोजित केली होती हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. रोटरी क्लब या संस्थेच्या आयोजकांनी रजिस्ट्रेशन फी च्या नावाखाली लाखों रुपये जमा केले आहेत. आयोजकांनी पैसे जमा करूनही कोरणा बाबतीतले कुठलेही नियम याठिकाणी पाळली नाहीत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अर्ज आलेला होता. शहर पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली असता खामगांव शहर पोलिस स्टेशन व शेगाव शहर तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडून सदर परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी निर्भिड स्वराज्यशी बोलताना सांगितले आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असताना एवढी भरमसाठ अशी रक्कम घेण्याची गरज काय ? असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सहभागी सर्व स्पर्धकांचे लसीकरण पूर्ण झाले होते काय ? याचाही विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे रोटरी क्लब द्वारे घेण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये प्रशासनाचे व पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळे आता या रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करते की ? त्यांना पाठीशी घालते हे पहावे लागेल.