कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना केले अन्न धान्य वाटप
संग्रामपूर : संपुर्ण देशात कोरोना या आजाराने उच्चांक गाठत असतांना संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनीषा पवार यांनी आदिवासी बहुबल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन उपस्थित आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून घेतल्या, कोरोना या महाभयंकर आजाराने संपुर्ण देशा सह महाराष्ट्र राज्यात थैमान घातला असल्याने शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असता या ला नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसात देत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक म्हणजे आरोग्य यंत्रणा ही आपले जीवाचे रान करत या संघर्षात महत्वाची भूमिका बजावत असल्याने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनीषा पवार यांनी ४ एप्रिल रोजी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या आदिवासी बहुबल संग्रामपूर तालुक्यातील पातुडा, वानखेड, सोनाळा या सह आदी गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भेट देऊन तेथील आपल्या कर्त्यव्यावर उपस्थित असलेल्या आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व आरोग्य यंत्रनेच्या असलेल्या गरजा जाणून घेतल्या. तसेच याबाबत सविस्तर माहिती घेतली व त्यांना आरोग्यसेवा बाबत आपले कार्य अत्यंत महत्वाचे असल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा या संघर्षात सहभागी असल्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त केले व आपली जबाबदारी ही पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यानंतर वरवट बकाल येथील सोनाळा मार्गा लागत असलेल्या एका शेतात गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात आले यावेळी संग्रामपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयूर वाडे,बुलडाणा जिल्हा कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ स्वाती वाकेकर, बावनबीर सर्कल जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षी हागे,जि. प.सदस्य प्रमोद खोद्रे, ज्ञानेदेव भारसाकडे,जानराव देशमुख,मेहकर चे देवानंद पवार,भास्कर ठाकरे, पातुडा सरपंच श्रीमती भोंगळ,वरवट सरपंच श्रीकृष्ण दातार,संतोष टाकळकार,माजी सभापती प्रवीण भोपळे,डॉ,वाघ,डॉ,रोजतकार,नरेंद्र राठी,गिरीष चांडक,राजू बकाल, शेख जलील,सुनील ढगे,यांच्या सह संग्रामपूर तालुक्यातील आरोग्य सेवा देणारे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.