सरपंच पती व ग्रामपंचायत सचिव यांचा प्रताप, शासनाचे आदेश नसतानाही ग्रामपंचायतची कामे सूरू
लोणार : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असताना सुध्दा लोणार तालुक्यातील खुरमपुर येथे मात्र मजुरांकडुन रस्त्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावातील गोविंद राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.बुलडाणा जिल्हयामध्ये प्रशासनाचे महत्त्वाचे कामे बंद असताना सुध्दा खुरमपुर येथे ग्रामपंचायत अंतर्गत 14 वित्त आयोगाचे काम सुरू आहे यावर 10 ते 15 मजुर ते ही मुंबई पुणे या ठिकाणावरून येऊन कोणत्याच प्रकारच्या वैदयकिय तपासण्या न करता काम करित आहे. सदर काम हे तात्पुरते करण्यासाठी गडबड केल्या जात असल्याचा ही आरोप तक्रारकर्त्यानी केला आहे.
सध्दा जगभरात कोरोना या विषाणुने थैमान घातलेले असताना केंद्र शासन व राज्यशासन च्या अंतर्गत येणारे सर्व कार्यक्रम व महत्वाची कामे रद्द केलेले असताना सुध्दा खुरमपुर येथील रस्त्याची कामे सर्रासपणे सुरू आहे या गावामध्ये प्रामुख्याने सत्तर टक्के मजुर वर्ग आहे तो कामानिमीत्त मुंबई, पुणे, नाशिक , सुरत , गुजरात , कर्नाटक , तेलंगणा , गोवा आदी राज्यामध्ये काम करण्यासाठी तसेच उसतोड कामगार सुध्दा मोठया प्रमाणात आहे. सदर मजुर वर्ग कोरोनाच्या भितीपोटी खुरमपुर येथे आलेला आहे त्यानी त्यांची कोणतीच वैदयकीय तपासणी केलेली नसल्याने व त्यातीलच काही मजुर सदर ग्रामपंचायतच्या कामावर असल्याने गावातील नागरिकाना याचा धोका निर्माण होउ शकतो एवढी मोठी गंभीर बाब असताना सुध्दा सरपंच पती समाधान राठोड व सचिव शेख मेहमुद यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सदर काम तात्पुरते करून एकाप्रकारे खुरमपुर गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केलेला आहे.
तरी या सर्व बाबीची गंभीर दखल घेत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावातील गोंवीद राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहेसदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री , पालकमंत्री, खासदार व आमदार , तहसिलदार , गटविकास अधिकारी व संबंधितांना दिल्या आहे. याबाबत जिल्हाधिकारी या प्रकरणावर काय कारवाई करतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.