खामगांव: आज बुलडाणा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी येथील सामान्य रुग्णालयात भेट देऊन कोविड परिस्थितिचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन जास्तीत जास्त लसीकरण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी करोना लसीकरण केंद्रात पाहणी केली. जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी आज खामगांव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात कोव्हिड लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसीकरणाचा टप्पा तातडीने पूर्ण करा,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. खामगाव येथील आरटीपीसीआर प्रयोगशाळा तातडीने सुरू झाली पाहिजे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील चाचण्यांचे अहवाल लवकर प्राप्त होतील आणि बाधित रुग्णांना उपचार मिळतील. खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आहेत. त्या ठिकाणी सिटी स्कॅन स्कोर बघून उपचार दिले जातात. त्यांची आर. टी. पी. सी.आर चाचणी केल्या जात नाही. त्यामुळे रुग्ण संख्या कमी दिसून येते. परिणामी जिल्ह्याला रेमेडेसिविर व ऑक्सीजन पुरवठा जिल्ह्याला कमी होतो. त्यामुळे खाजगी रुग्णालय मधील रुग्णांची आर. टी. पी. सी.आर चाचणी करावी. तसेच कोविड उपचार सुरू असलेल्या रुग्णांची बाधित म्हणून नोंद करा. बेडची माहिती मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ॲपची तांत्रिक ता तपासून ते लाँच करावे. स्वच्छतेत कुठलीही तडजोड न करता परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सक्तीच्या सूचना केल्या. सामान्य रुग्णालयातील सर्व नियोजन पाहुन यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांचे कौतूक केले. यावेळी उपजिल्हाधिकारी गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, वैद्यकीय अधिकारी निलेश टापरे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनकर खिरोडकर ,खामगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आकोटकर, गटविकास अधिकारी राजपूत यांच्या सह अधिकारी उपस्थित होते.