January 4, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ५२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ५२ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ४९६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत १९ कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या १९ असून सध्या रूग्णालयात ४ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज २ मे रोजी ५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ५२ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २४ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४९६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य : जिमाका

Related posts

(Home quarantine)गृह विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

nirbhid swarajya

महिलांच्या सुरक्षेसाठी शहर पोलीस ॲक्शन मोडवर

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा तीव्र निषेध

nirbhid swarajya
error: Content is protected !!