October 6, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले आतापर्यंत ७४८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात काल जळगाव जामोद येथील ७२ वर्षीय मृत वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३० कोरोनाबाधित रूग्ण आहेत.तसेच खामगांव येथील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. अशाप्रकारे जिल्ह्यात  कोरोनाबाधीत मृतांची संख्या तीन झाली आहे.  आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात ०४ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आज १९ मे रोजी ०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०६ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ११७ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ७४८ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

.

Related posts

अवैधरित्या दारूची वाहतुक करतांना दोघांना पकडले

nirbhid swarajya

मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदाराने निवेदन चिटकवले दरवाज्यावर

nirbhid swarajya

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला

nirbhid swarajya
error: Content is protected !!