December 14, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात आज प्राप्त ६ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६२१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आज १० मे रोजी तीन रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात एकही रूग्ण कोरोनाबाधीत नाही.   तसेच आज १० मे रोजी ०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०६ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने १५ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६२१ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

जोशी नगरातील छकुली गार्डनमध्ये दोन गट आमने सामने

nirbhid swarajya

शासकीय व खाजगी रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करावे – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

खडकपूर्णा चे 5 दरवाजे उघडले

nirbhid swarajya
error: Content is protected !!