बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 27 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा मंगलगेट मलकापूर येथील 67 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिला काल 24 जुन रोजी मृत पावली असून या महिलेचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे.
तसेच आतापर्यंत 2353 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 135 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 135 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 170 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11 मृत आहे. तर सध्या रूग्णालयात 24 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 25 जुन रोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 पॉझीटीव्ह, तर 27 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 53 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2353 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post