खामगाव: महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल आवार येथील जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर मध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ.सुरेखाताई गुंजकर या होत्या.त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या राज्य घटनेचे शिल्पकार आहेत तसेच त्यांचे अभ्यासातील सातत्य याबद्दल माहिती सांगून जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक अल्हाट सर यांनी देशाच्या उन्नती मध्ये डॉ बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. तर अभिषेक लोखंडकार, सोहम मारके, नागेश खराटे आदी विद्यार्थ्यांनी गीत तसेच भाषण सादर करून महामानवाला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन सौ. ज्योती मोरे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक संतोष अल्हाट सर यांनी केले. यावेळी ब्राम्हने सर , उतपुरे सर , घोडके सर , हिवराळे सर , निलेश कवळे सर , नवनीत फुंडकर सर, शुभम सर ,कुलकर्णी मॅडम ,संजोरे मॅडम ,मोरे मॅडम, अंभोरे मॅडम, अकोटकर मॅडम, गवात्रे मॅडम ,ठाकरे मॅडम, लावरे मॅडम, डाबरे मॅडम ,शेलकर मॅडम , डीक्कर मॅडम ,कु बोर्डे मॅडम,व्यवहारे मॅडम, पाटील सर, तायडे, शिवा ठाकरे , बोचरे ताई , माया ताई आदी शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
next post