खामगाव :-दिनांक ७ फेब्रु २०२२ रोजी गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्री रामकृष्ण जी गुंजकर सर तसेच साचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर यांच्या हस्ते लतादीदीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.लता दीदी चे संगीतातील योगदान याबद्दल प्रा गुंजकर सर यांनी उपस्थितांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यानी लता दीदी नी गायलेले गीत सादर करून तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीता द्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली.यावेळी गुंजकर सीनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री सतीशजी रायबोले सर जिजाऊ स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रा सौ बनकर मॅडम उपमुख्याध्यापक श्री अल्हाट सर , प्रा ऐहासान सर प्रा विरघट सर प्रा शाम राऊत ,प्रा डॉ घई ,प्रा भगत , श्री ब्राम्हणे सर ,श्री हिवराळे सर, श्री उतपुरे, श्री घोडके सर, श्री वांडे सर , श्री निळे सर, व्यवहारे मॅडम, गवात्रे मॅडम, अकोटकर मॅडम ,ठाकरे मॅडम ,डाबरे मॅडम, अंभोरे मॅडम, मोरे मॅडम, कुळकर्णी मॅडम, शेलकर मॅडम ,सांजोरे मॅडम , लाव्हरे मॅडम, बोचरेताई श्री अविनाश ठाकरे ,श्री निलेश कवळे ,श्री दामू मिसाळ श्री शिवा ठाकरे ,श्री घनमोडे, श्री संजूभाऊ इंगळे ,श्री तायडे भाऊ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.