विद्यार्थीच बनले संस्था चालक,शिक्षक व इतर कर्मचारी
खामगाव: आजचा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवारमध्ये आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सरस्वती माता यांच्या प्रतिमेला संस्थेच्या सचिव प्रा. सौ. सुरेखाताई गुंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यामधे स्वयंप्रशासान अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन कसे चालते तसेच शिक्षकांचे कार्य व जबाबदारी यांची माहिती होण्यासाठी आज विद्यार्थी यांनी स्वतः शिक्षक होऊन शिकविण्याचे कार्य केले.यामधे शाळेचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून अभिषेक लोखंडकर,सचिव प्राची इंगळे,मुख्याध्यापक आचल पाटेखेडे, उपमुख्याध्यापक पार्थ भट्टड,यांनी तर शिक्षक म्हणून कुणाल खंडगळे, वाडेकर, श्रुती भोरे ओम मुजुमले,अभिषेक डीक्कर,नागेश बघे, श्रावणी कापले ,ठाकरे राधिका टिकार , नेहा राजपूत, श्रेया साठे, रिया सरकटे, प्रांजली गावंडे , कोमल कटोने , सेजल खराटे, अश्विनी मंजुळकर, उन्नती साठे यांनी शिक्षकांचे कार्य सांभाळले तसेच शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नागेश खराते,प्रतीक बकाल शिवम निबाळकर,ओम काळे पूजा वांढे व रुचिता आदी विद्यार्थी व विद्यार्थांनी पदभार सांभाळला.यानंतर विद्यार्थ्यानी शिक्षकाप्रती आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. डाबरे यांनी केले व आभार हिवराळे यांनी केले.