खामगाव : २६ नोव्हेंबर २००८ ला संपूर्ण जगाला हादरून टाकणारी घटना मुंबईत घडली. दहशतवादी हे सागरी मार्गाने मुंबईत येऊन मुबंई मध्ये अचानक सार्वजनिक ठिकाणी व हॉटेल्स मध्ये अंदाधुंद गोळीबार करून त्यामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वीर जवानांना व निरपराध लोकांना मृत्युमुखी पाडले होते. त्यामधील अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना सुद्धा जशास तसे उत्तर देऊन आपल्या वीर जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले होते. याच दहशतवादयांच्या भ्याड हल्ल्यात भारत मातेच्या शहीद झालेल्या वीर जवानांना व निरपराध लोकांनां आपला जीव गमवावा लागला होता. २६ नोव्हेंबर २०२१ ला जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये २६/११ च्या भ्याड हल्यात भारतमातेच्या शहीद झालेल्या वीर जवानांना व निरपराध लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ शिला अंभोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधाना बद्दल अमूल्य योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये आपले विचार मांडताना कु समीक्षा सरदार,कु संस्कृती टिकार,कु श्रुती महारखेडे,कु उन्नती साठे,कु प्राची इंगळे,कु ऋतुजा कवडकार, कु तन्वी गवई,गोपाल धोत्रे, यांच्या सह शिक्षिका सौ ज्योती मोरे,जाधव यांनी सुद्धा भारतीय संविधानाची गरज व त्याचं महत्व याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.व शिक्षिका सौ शितल ठाकरे यांनी सुद्धा ”विजलो जरी आज मी,हा माझा अंत नाही,पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही” ओळीने सुरवात करून आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा सौ अपर्णा बनकर मॅडम,प्रा अल्हाट सर व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थिनी कु रितू पाटेखेडे,कु जान्हवी कुंटे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन कु.आचल पाटेखेडे हिने केले.