दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह
खामगाव-: राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रा. गुंजकर सरांच्या आवर येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेजमध्ये दोन दिवशीय भव्य अविष्कार स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडले. या मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा आविष्कार बघायला मिळाला.या भव्य स्नेहसंमेलनाचे 11 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उदघाटन झाले.उदघाटन सोहळ्या पूर्वी गुंजकर सरांच्या आई सौ.अन्नपूर्णा दगडूजी गुंजकर यांचे नाव देण्यात आलेल्या सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उदघाटन सोहळ्या नंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. भव्य रंगमंचावर विद्यार्थ्यांनी लोकगीते, देशभक्तीपर गीतांवर सोलोडान्स एकलडान्स, नाटिका, एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीदिनी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीच्या उदघाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. अशोक बावस्कर, तर प्रमुख अतिथी म्हणून तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक श् मंजितसिंग शीख ,खबरे शामतकचे संपादक अशोक जसवानी, समाजसेवक रवी जोशी, पत्रकार बापू देशमुख,
महाराज विष्णू घाडगे, पब्लिक कॉन्टॅक्टचे संपादक गजानन राऊत , सांज प्रखरचे संपादक मोहन हिवाळे जनोपचार चे संपादक नितेश जी मानकर लेखणी अस्त्रचे संपादक अनुप गवळी,पथप्रदीपचे संपादक ,योगेश हजारे , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर , सचिवा सौ सुरेखाताई गुंजकर संस्थेचे संस्थापक सदस्य नंदकिशोर गुंजकर,कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले ,शाळेचे मुख्याध्यापक संतोष अल्ल्हाट आदींची मंचावर उपस्थिती होती.उदघाटन कार्यक्रमा नंतर दिवसभर विद्यार्थ्यांचे संस्कृतीक पार पडले.सायंकाळी राष्ट्रगीताने आविष्कार स्नेहसंमेलनाचा समारोप झाला.या स्नेहसंमेलना साठी गुंजकर कॉलेज मधील प्राचार्य सतीश जी रायबोले, प्रा.गजानन विरघट, प्रा दीपक भराड, प्रा.मनीष भुईभार,प्रा.विनीत भाटिया, प्रा. दीपक जावरे,प्रा.इरफान खान,प्रा. माधुरी जाधव प्रा.डॉक्टर अंजली, प्रा.ज्योती शर्मा, प्रा.पवार, कॉम्प्युटर ऑपरेटर संदीप सातपुते, व जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर मधील संतोष आल्हाट(मु अ)
विवेक ब्राम्हणे (स शि), विवेक बोचरे (स शि), विशाल घोडके (स शि),शुभम हट्टेल. (स शि), अक्षय पाटील (स शि), विष्णू उतपुरे. (स शि), कुणाल हिवराळे. (स शि), कू शरयू कुळकर्णी. (स शि),सौ .शीतल ठाकरे (स शि), सौ. सीमा डाबरे (स शि), कु. हर्षाली डिक्कर. (स शि),सौ. ज्योतिका शेलकर.(स शि),कु. भावना लाव्हरे (स शि), सौ शिला अंभोरे (स शि), सौ धनश्री गावत्रे. (स शि),कु गायत्री बोर्डे. (स शि), सौ. दीपिका अकोटकर (स शि), सौ. ज्योती मोरे (स शि),
जयश्री सांजोरे (स शि),कु. राखी व्यवहारे (स शि),अविनाश ठाकरे (वरिष्ठ लिपिक),निलेश कवळे ( लिपिक/ रोखपाल), नवनीत फुंडकर (लिपिक), शिवशंकर ठाकरे ( शिपाई), विजय तायडे (शिपाई), संजय इंगळे (शिपाई), गजानन टाकसाळ ( चौकीदार ),सौ .मंदा तायडे (शिपाई ),श्रीमती कुसुम बोचरे (शिपाई) यांनी अथक परिश्रम घेतले.