बुलढाणा- अनेक वर्षांपासूनची जिजाऊ प्रेमींची मागणी अखेर आज पूर्ण झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा प्रशासनाने उद्या १२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या ठिकाणी लाखो शिवभक्तांचा मेळा भरतो. तर राजवाड्यावर माँ जिजाऊंच्या दर्शनासाठी जनसागर उसळत असतो, अखिल विश्वातील मराठी मनांचे आराध्य दैवत असलेल्या माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुटी घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या मागणीला योग्य न्याय देण्याचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर एचपी तुम्मोड यांना मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यातील तीन सुट्ट्यामध्ये पहिल्यांदाच मा जिजाऊ जयंती चा समावेश करून जिल्हाधिकारी यांनी जिजाऊ प्रेमीनां आनंदाची भेट दिली आहे.बाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे…