December 29, 2024
खामगाव जळगांव जामोद नांदुरा बातम्या मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर राजकीय विदर्भ शेगांव संग्रामपूर

जिगाव प्रकल्पाला माॅ जिजाऊ महासागर नाव द्यावे अ.भा. मराठा महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन…

बुलढाणा: जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व माँसाहेब जिजाऊंचे माहेरघर असल्याने जिल्ह्यात होणाऱ्या जिगावं प्रकल्पाला माँ जिजाऊ महासागर हे नाव देण्यात यावे या मागणीसह विदर्भ विर स्व.अण्णासाहेब पाटील येरळीकर (यांचे जन्म गांवी) भव्य स्मारक बांधण्यात यावे,जिगांव प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील बाधीत शेतकऱ्यांना शेताची व फळबागाची थकीत रक्कम देण्यात यावी.मराठा समाजातील युवा बेरोजगारांना शासकिय सेवेत समाविष्ठ करुन घेण्यात यावे, येरळी उड्डान पुलाला विदर्भविर स्व.अण्णासाहेब पाटील नाव देण्यात यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले व ही मागणी योग्य आहे असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी ह्या मागण्या लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे,बुलडाणा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील,विदर्भ संघटक सुभाष झांबड,जिल्हा सदस्य अंबादास पाटील,मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष ज्ञानदेव पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

Financial Gravity Hosts AI Design Challenge For Tax Planning Software

admin

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यात शहरातून परतले ३८७७९ नागरिक

nirbhid swarajya
error: Content is protected !!