बुलडाणा : काल बुलडाणा येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अा.डॉ.संजय कुटे यांनी १० जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेंद्रजी शिंगणे ह्यांना जिगावं प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याबद्दल निवेदन दिले होते त्यानुसार आज जिल्हा नियोजन सभागृहामध्ये मा. पालकमंत्री डॉ.शिंगणे साहेब ह्यांच्या अधयक्षतेखाली बैठक
संपन्न झाली.त्यामध्ये ह्या बैठकीमध्ये मा. पालकमंत्री व मा.आमदार डॉ.संजय कुटे ह्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा भूसंपादन अधिकारी ह्यांना निर्देश दिलेत की, नवीन भूसंपादन व भुमिअधी ग्रहण व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ चया कलम ११ ते २१ नुसार कायदेशीर कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही ह्यादृष्टीने कायदेशीर कार्यवाही करावी.तसेच प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्यास मी कदापीही सहन करणार नाही व प्रकल्पग्रस्तांसाठी मी आंदोलन करीन व वेळ पडल्यास स्वतः न्यायालयात जाईल व ह्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.त्यावर जिल्हा प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला असुन त्यानंतर निर्णय घेवू असे सांगितले.ह्या बैठकीला मा.पालकमंत्री शिंगणे साहेब, आ.डॉ.संजय कुटे,आ.राजेश एकडे, आ.संजय गायकवाड जिल्हा परिषद सदस्य बंदुभाऊ पाटील, अा.संजय कुटे ह्यांचे स्विय सहायक डॉ.शेख,अशोक मुरुख ,ज्ञानेश्वर टीकार,ज्येष्ठ विधीज्ञ एड.सुधाकर दळवी साहेब,एड.अमित दळवी,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.सुपेकर, कार्यकारी अभियंता श्री.चौधरी, श्री.हजारे ,श्री. रालेकर ,जिल्हा पुनर्वसन समिती सुधाकर सबे, मोहन गई ईतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.ह्या बैठकी मधून शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय होईल ही आशा वाटते,