बुलडाणा : जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनीवरील बांधकाम, लागवड केलेली फळझाडे, पाईप लाईन आदींचे नमुना ड नुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमूख मागणीसाठी आ. डॉ. संजय कुटे यांनी आज १ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरु केले आहे. जिगाव प्रकल्पात एकुण ३२ गावे अंशता तर २२ गावे पूर्णता बाधित झाली आहेत. त्यापैकी ४ गावांचे १५ ड नुसार मुल्यांकन होऊन पैसे वाटप झाले आहे. अद्याप १८ गावांचा प्रश्न कायम आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी नमूना ड नुसार ४ गावांना मान्यता दिली होती, यामध्ये आडोळ, बेलाळ, पातोंडा व कोदरखेड या गावांचा समावेश आहे. त्यामूळे या ४ गावातील प्रकल्पग्रस्तांना पैसे मिळाले. तत्पूर्वीच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी इतर १८ गावांना नमूना ड ची मान्यता दिली नाही, अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी शिवाजी मानकर यांनी दिली असून आज प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.जिगाव हा शेतकऱ्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.गेल्या एक तासापासून जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे सोबत दालनात सविस्तर चर्चा सुरु होती परंतु प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने ठिय्या आंदोलनाला बसावे लागले आहे.संबंधित यंत्रणेने माझे समाधान केल्यावरच आंदोलन मागे बाबत निर्णय घेईल असे आ. डॉ. संजय कुटे यांनी सांगितले आहे.